आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rishi Kapoor Doesn't Want Ranbir To Host Bigg Boss 8

रणबीरने 'बिग बॉस 8'चा होस्ट होऊ नये अशी ऋषींची इच्छा, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा रॉकस्टार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता रणबीर कपूर इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीरकडे सिनेमे आणि जाहिरातींची रिघ लागली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतही त्याला बरीच डिमांड आहे.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, की रणबीर बिग बॉसच्या आठव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहे. मात्र रणबीरने लवकरच या बातम्यांना पूर्णविराम लावला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरचे वडील ऋषी कपूर यांची रणबीरने छोट्या पडद्यावर पदार्पण करु नये अशी इच्छा आहे. त्यातच जो शो नेहमी वादाच्या भोव-यात असतो, अशा शोचा भाग तर रणबीरने मुळीच होऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, आता रणबीरने बॉलिवूडवरच आपले लक्ष केंद्रित करायला हवे.
बिग बॉसचे मागील चार पर्व सलमान खानने होस्ट केले होते. बिग बॉसच्या सातव्या पर्वादरम्यान सलमानने घोषणा केली होती, की तो या शोचे पुढचे पर्व होस्ट करणार नाही. सलमानने घेतलेल्या निर्णयानंतर निर्माते नवीन सूत्रसंचालकाच्या शोधात आहेत.
असो, रणबीरने छोट्या पडद्यावर पदार्पण करु नये, अशी जर ऋषी कपूर यांची इच्छा असेल, तर तो नक्कीच आपल्या वडिलांच्या इच्छेचा मान ठेवले. तसे पाहता, रणबीरनेसुद्धा अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते, की त्याला बिग बॉस 8 ची ऑफर मिळाली आहे, मात्र त्याने ती नाकारली आहे.
आता रणबीरच्या नकारानंतर निर्माते नवीन सूत्रसंचालकाच्या शोधात आहे. त्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत बोलणी सुरु आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बिग बॉस हा कार्यक्रम आजवर कोणकोणत्या कलाकारांनी होस्ट केला आहे...