आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riteish Deshmukh Celebrates His 36th Birthday Today

B\'Day: जेनेलियापेक्षा वयाने नऊ वर्षे मोठा आहे रितेश, पाहा दोघांचे रोमँटिक क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः रितेश आणि जेनेलिया देशमुख)
भारतीय सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. 17 डिसेंबर 1978 रोजी दिवंगत राजकारणी विलासराव देशमुख यांच्या घरी रितेशचा जन्म झाला. अभिनेत्यासोबतच रितेश एक आर्किटेक्टसुद्धा आहे. कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्चर अँड एनव्हायरमेंट स्टडीजमधून रितेशने आर्किटेक्ट विषयात पदवी प्राप्त केली आहे. 2003 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकण्यापूर्वी रितेशने परदेशातील आर्किटेक्चर अँड डिझायनिंग कंपनीत वर्षभर कामसुद्धा केले आहे.
भारतात परतल्यानंतर 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमाद्वारे रितेशने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. आपल्या दहा वर्षांच्या करिअरमध्ये रितेशने स्वतःला बॉलिवूडमध्ये सिद्ध केले आहे. मस्ती, क्या कुल है हम, बरदाश्त, अपना सपना मनी मनी, मालामाल विकली. हे बेबी, धमाल, दे ताली, डबल धमाल, एक व्हिलन, क्या सुपर कूल है हम यांसारखे हिट सिनेमे त्याने बॉलिवूडला दिले आहेत.
रितेशने याचवर्षी लय भारी या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केले आहे. मराठीतील यशस्वी निर्माता म्हणून तो नावारुपास येतोय. त्याची निर्मिती असलेले 'बालक पालक' आणि 'यलो' हे सिनेमे प्रचंड गाजले असून अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावी केले आहेत. रितेशचे लग्न बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुखसोबत झाले आहे.
'तुझे मेरी कसम' या सिनेमात हे दोघे पहिल्यांदा एकत्र झळकले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. आठ ते नऊ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 3 जानेवारी 2012 रोजी रितेश जेनेलियासोबत लग्नगाठीत अडकला. जेनेलिया रितेशपेक्षा वयाने नऊ वर्षे लहान आहे. याचवर्षी 25 नोव्हेंबरला जेनेलियाने गोंडस बाळाला जन्म दिला. बॉलिवूडच्या या क्यूट कपलने आपल्या बाळाचे नाव रिआन असे ठेवले आहे.
आज रितेशच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला जेनेलियासोबतची त्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये दोघांच्या निखळ प्रेमाची झलक बघायला मिळते.