(रितेश देशमुख आणि रिया चक्रवर्ती)
मुंबई- यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत तयार होणारा 'बँक चोर' सिनेमाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरु आहे. शुक्रवारी (19 डिसेंबर) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रितेश देशमुख दिसला. ऑन लोकेशन शूटिंगदरम्यान सिनेमाची नायिका रिया चक्रवर्तीसुध्दा दिसली.
रितेशला मागील महिन्यात 25 नोव्हेंबरला मुलगा झाला आहे. त्यामुळे तो काही दिवसांत शूटिंगपासून दूर होता. मात्र, आता त्याच्या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. सिनेमात रितेश एक बँक चोरच्या भूमिकेत आहे. सेटवर रितेश देशमुख व्हाइट शर्ट, ब्राऊन ट्राऊझर, ब्लू ब्लेजर आणि हॅट अशा लूकमध्ये दिसून आला. तसेच, रिया चक्रवर्ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिच्या पाठीवर उडणा-या पक्षाचे टॅटू गोंदलेले होते.
बँक चोर विनोदवीर
कपिल शर्माला ऑफर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्याला सिनेमात न घेण्याचा निर्णय घेतला. सिनेमात विवेक ओबेरॉयसुध्दा झळकणार आहे, तो सीबीआय ऑफिसरचे पात्र साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बँक चोर'च्या On Locationची छायाचित्रे...