आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Riteish Deshmukh Hosts A Screening Of ‘Ek Villain’

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रितेशच्या कुटुंबियांनी बघितला 'एक व्हिलन', इतर सेलेब्सही पोहोचले, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून : अभिनेत्री जेनेलिया, रितेशची आई वैशाली देशमुख, रितेश देशमुख आणि सोबत जेनेलियाची आई जीनेट
मुंबई - 'एक व्हिलन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांनी जीवतोड मेहनत घेतली. खरं तर 'हमशकल्स'च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेला रितेश या सिनेमाच्या प्रमोशनला फार वेळ देऊ शकला नाही. त्यामुळे त्याने रिलीजच्या एक दिवसापूर्वी मुंबईत 'एक व्हिलन'चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यामध्ये रितेशच्या कुटुंबियांसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
'एक व्हिलन' या सिनेमाचे हे तिसरे स्क्रिनिंग होते. यावेळी दिग्दर्शक सुजॉय घोष, अभिनेता आयुष्मान खुराना, रितेशचा धाकटा भाऊ धीरज देशमुख, रितेशची आई वैशाली देशमुख, शैतान सिनेमातील अभिनत्री किर्ती कुल्हारी, व्हिजे रमोना, दिग्दर्शक अनुभव सिन्हा पोहोचले होते. याशिवाय रितेशचे सासूसासरे जीनेट आणि नेल डिसुजासुद्धा आपल्या जावयाच्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला आवर्जुन हजर होते.
अभिनेता आशिष चौधरी पत्नी समिता भंगारीसह आणि लारा दत्ता पती महेश भूपतिसह येथे आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'एक व्हिलन'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...