आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश-जेनेलियाला चिमुकल्याची प्रतिक्षा, छायाचित्रांमध्ये पाहा दोघांमधील प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने मान्य केले आहे, की त्याची पत्नी जेनेलिया प्रेग्नेंट आहे. ही गोष्टी त्याने आलीकडेच एका लीडिंग मिडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत स्वीकार केली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याला जेव्हा जेनेलियाच्या प्रेग्नेंसीविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले, 'हो जेनेलिया प्रेग्नेंट आहे आणि आम्ही आमच्या चिमुकल्यासाठी खूप उत्साही आहोत.' अनेक दिवसांपासून जेनेलियाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र जेनेलिया आणि रितेश या बातम्यांना सतत नाकारून अफवा असल्याचे सांगत होते.
जेनेलिया जेव्हा रितेशससह 'यलो' या मराठी सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचली होती तेव्हापासून तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या यायला लागल्या. त्यानंतर रितेश टेम्पामध्ये पार पडलेल्या आयफा अवॉर्ड्समध्ये एकटाच सामील झाला होता. त्यावेळी माध्यमांनी तर्क लावला होता, की जेनेलिया प्रेग्नेंट असल्याने तो एकटाच या समारंभात सामील झाला असावा. तेव्हाही रितेशने या गोष्टीं नकारल्या होत्या.
त्याने दिलेल्या या मुलाखतीत असेही सांगितले, 'जेनेलियाचे हास्य आणि प्रत्येक गोष्टीत काम करण्याची इच्छा खूप मला आवडते. जेनेलिया आणि त्याचे विचार खूप मिळते-जुळते आहेत. दोघांनाही भेलपूरी खूप आवडते.'

दोघांमधील हे प्रेम तुम्हीच बघा. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा जेनेलिया आणि रितेश यांच्यामधील प्रेम...