आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा मेड फॉर इच इदर असलेल्या या क्यूट कपलचे Romantic क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - रितेश आणि जेनेलिया देशमुख)
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी जेनेलिया देशमुख हिने मंगळवारी आपला 27 वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची जेनेलियाने जोडिदाराच्या रुपात निवड केली आहे. जेनेलियाच्या हबीने अर्थातच रितेशने तिला सोशल मीडियाच्या माध्यमातूसुद्धा बर्थ डे विश केला. रितेशने ''The Baiko's Birthday - thank you for making my eorld so beautiful - Wadhdiwasachya Hardik Shubhechyaa..'' या शब्दांत जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून रितेश आणि जेनेलियाकडे बघितले जाते. 3 जानेवारी 2012 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले. आता देशमुखांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. जेनेलियाकडे गोड बातमी असल्याचे काही दिवसांपूर्वीच रितेशने आपल्या चाहत्यांना सांगितले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या या क्यूट कपलचे रोमँटिक क्षण दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा एकत्र कसा वेळ घालवतात रितेश आणि जेनेलिया...