आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रियान देशमुख\', रितेश-जेनेलियाच्या बाळाचे झाले बारसे, जेनेलियाची आई होती उपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रितेश, जेनेलिया आणि रितेशची आई वैशाली देशमुख यांच्या कुशीत मुलगा आणि जेनेलियाची आई जेनेट डिसूजा)
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांना अलीकडेच पुत्ररत्न प्राप्त झाले. आता बातमी अशी आहे, की देशमुख कुटुंबीयांनी बाळाचे बारसे केले आहे. या कार्यक्रमात रितेश-जेनेलियाच्या बाळाचे नाव 'रियान' ठेवण्यात आले. रितेशने टि्वट करून सांगितले, की 'Our Son 'RIAAN RITESH DESHMUKH''.
जेनेलियाने 25 नोव्हेंबरला गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर लगेच रितेशने 'It's a BBOOOOYYYYYY!!!!!!!!' असे टि्वट केले होते. 29 नोव्हेंबरला जेनेलियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. देशमुख कुटुंबात या चिमुकल्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रितेशचे टि्वट आणि रितेश-जेनेलियाची बाळासोबतची छायाचित्रे...