आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशने वडिलांना समर्पित केला राष्ट्रीय पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'यलो' या मराठी चित्रपटाचे सर्वच स्तरातून भरपूर कौतुक झाले आहे. 'बालक पालक'नंतर रितेश देशमुखची निर्मिती असलेला हा दुसरा चित्रपट आहे. या मराठी चित्रपटाच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी रितेश देशमुखला अलीकडेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्याला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार त्याने आपले वडील कै.विलासराव देशमुख यांना सर्मपित केला आहे.
याबाबत रितेशने ट्विट केले आहे की, 'हा माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार असून तो वडिलांना समर्पित करतो. जर आज ते हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. त्यांनी हसत हसत म्हटले असते, खूप छान रितेश.'