आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रितेशच्या \'लय भारी\'च्या शुटिंगला सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लय भारी' म्हणत अभिनेता रितेश देशमुख पहिल्यांदाच मराठी पडद्यावर झळकणार आहे. 'बालक पालक' या सिनेमाची निर्मिती केल्यानंतर आता रितेश मराठी सिनेमात काम करतोय. त्यामुळे तो खूप खुश आहे. रितेशने आपल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे.

आपल्या पहिल्या मराठी सिनेमाविषयी रितेश म्हणाला की, ‘'मी आपल्या पहिल्या मराठी ‘लय भारी’ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. मराठी सिनेमापर्यंत पोहोचण्यासाठी मला दहा वर्षे लागली. दिग्दर्शक निशिकांत कामतबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे ''

विशेष म्हणजे हा सिनेमादेखील रितेशच्या प्रॉडक्शनमधीलच आहे. रितेशच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या ‘बालक पालक’ सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉलिवूडच्या लोकांनीदेखील या सिनेमाचे कौतुक केले होते. एकूणच रितेशला मराठी सिनेमात बघण्यासाठी त्याचे चाहतेही नक्कीच उत्सुक असतील.