आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लय भारी'साठी रितेशने केलीय जय्यत तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('लय भारी' सिनेमातील रितेशचा लूक)
मुंबई - गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'एक व्हिलन' या सिनेमाने रिलीजच्या केवल चार दिवसांत 54.5 कोटींचा (शुक्रवार- 16 कोटी, शनिवार-13 कोटी, रविवार -18 कोटी आणि सोमवार- 7.5 कोटी) व्यवसाय केला. सिनेमाच्या यशात संगीत, मोहित सुरीचे दिग्दर्शन आणि श्रद्धा कपूरचा वाटा आहे. मात्र त्याहीपेक्षा अभिनेता रितेश देशमुखचा अभिनय जास्त पसंत केला जातोय.
करिअरच्या बारा वर्षांत पहिल्यांदाच रितेशच्या अभिनयाचे एवढे कौतूक होत आहे. आत्तापर्यंत त्याला विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जात होते. मात्र 'एक व्हिलन'मध्ये त्याने सायको किलरची भूमिका साकारुन स्वतःला गंभीर अभिनेत्याच्या रुपात प्रस्थापित केले आहे. याशिवाय तो मराठीतील गेम चेंजर निर्मातासुद्धा म्हणूनही नावारुपास येतोय.
रितेशची निर्मिती असलेल्या 'बालक पालक', 'यलो' या सिनेमांचेही खूप कौतुक झाले. आता 11 जुलै रोजी रिलीज होणा-या 'लय भारी' या मराठी सिनेमाद्वारे रितेश मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमात रितेश अॅक्शन हीरोच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रितेशने पहिल्यांदा आपल्या वडिलांचे नाव आपल्या स्क्रिन नावासोबत जोडले आहे. स्क्रिनवर रितेश विलासराव देखमुख असे पूर्ण नाव लिहिण्यात आले आहे.
सहसा मराठी सिनेमांचा बजेट दोन ते अडीच कोटींच्या घरात असतो. मात्र रितेशचा 'लय भारी' या सिनेमाचा निर्मिती खर्च तब्बल दहा कोटींच्या घरात आहे. हा सिनेमा देशभरात सबटायटल्ससह रिलीज करण्यात येणार आहे.
झी ग्रुपच्या सर्व वाहिन्यांवर विशेषतः झी मराठीवर या सिनेमाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे. ओवरसीज मार्केटमध्येही सिनेमा कसा चांगला व्यवसाय करु शकेल, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.