आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rithvik Dhanjani,Asha Negi, Pratyusha Banerjee Watch Kuku Mathur Ki Jhand Ho Gayi

\'कूकू माथूर की झंड हो गयी\'च्या स्क्रिनिंगला पोहोचले टीव्ही स्टार्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकता कपूरची निर्मिती असलेला आगामी 'कूकू माथूर की झंड हो गयी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 30 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यानिमित्ताने खास टीव्ही स्टार्ससाठी अलीकडेच या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला जय सोनी, रवी दुबेसह बरेच टीव्ही स्टार्स पोहोचले होते.
'ये है मोहब्बतें' या मालिकेत निगेटीव्ह भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता हसननंदानील रोहित रेड्डीसह स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाली होती. तर 'महाभारत'मध्ये झळकलेली रतन राजपूत, बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीसुद्धा स्क्रिनिंगस्थळी दिसल्या. याशिवाय 'नच बलिये 6'ची विजेती जोडी ऋत्विक धनजानी आणि आशा नेगीसुद्धा यावेळी एकत्र दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कूकू माथूर की झंड हो गयी सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी क्लिक झालेली टीव्ही सेलेब्सची खास छायाचित्रे...