आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rjun Kapoor Ranveer Singh, Shah Rukh Ajay: Meet The ‘Frenemies’ Of Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरूख-अजय ते दीपिका-सोनम पर्यंत, हे आहेत बॉलिवूडचे 'FRENIEMIES'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-रणवीर सिंह आणि अर्जून कपूर)
मुंबई- बॉलिवूडमध्ये आजकाल 'फ्रेनिमीज्'ची जोरदर चर्चा सुरू आहे. (फ्रेनिमीज् हा शब्द त्या सेलिब्रिटीजसाठी वापरला आहे जे आधी मित्र होते आणि आता एकमेकांचे शत्रू झाले आहेत.). बॉलिवूडमध्ये जिथे नवीन 'फ्रेनिमीज्'मुळे 'फ्रेनिमीज्'च्या आठवणी ताज्या होत आहेत, त्यांनी आपापसातल्या स्पर्धेमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
मुंबईताल एका प्रमुख वर्तमानपत्राने अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांच्यातील भांडणाची बातमी प्रसिद्ध केली आहे. ह्या दोन्ही युवा अभिनेत्यांचा शुट्सच्या डेटवरून एकमेकांशी वाद झाला आहे. यशराज कंपनीच्या बिझनेस टीममधल्या एका सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये कोणताही तणाव नाही. हे दोघे चांगले मित्र आहेत.

अर्जून सध्या 'तेवर'च्या तर दुसरीकडे रणवीर 'दिल धडकने दो'च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अशी बातमी आहे की एका जाहिरातीच्या शुटींगसाठी दोन्ही अभिनेत्यांमध्ये डेट क्लॅशचा प्रॉब्लेम आला. आता या जाहिरातीला जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात शुट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावेळी हे दोघेहीजण यासाठी वेळ देऊ शकतील. एकेकाळी या दोघांना जिगरी दोस्त मानले जात होते, परंतू आता यांच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. दोघेजण एकमेकांवर खार खाण्याची एकही संधी सोडत नाहीत.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा बॉलिवूडच्या इतर फ्रेनिमीदबद्दल, जे एकमेकांचा चेहरादेखील बघायला आवडत नाही....