मुंबईतील यारी रोड (अंधेरी)
प्रियांका चोप्राच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या रोडला डॉ. अशोक चोप्रा मार्ग असे नाव देण्यात येणार आहे. याचा उद्घाटन सोहळा मंगळवारी 10 जून रोजी पार पडणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यारी रोडवरील नामकरण सोहळा पार पडणार आहे. सूत्रांच्या मते, ठाकरे आणि चोप्रा कुटुंबीयांमध्ये चांगले संबंध आहेत. या सोहळ्याप्रसंगी प्रियांकाची आई मधू चोप्रा, भाऊ सिद्धार्थ आणि तिच्या एनजीओचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
प्रियांका सध्या युरोपियन क्रूज लाइनरवर दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो'ची शूटिंग करत आहे. या शूटिंगमधून आर्वजून वेळ काढत ती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. प्रियांकाचे वडील सैन्यदलात होते. शिवाय शल्यचिकित्सक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. गेल्या वर्षी त्यांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. डॉ. अशोक चोप्रा यांनी आपल्या आयुष्यातील 27 वर्षे भारतीय सैन्य दलात घालवली होती. लेह आणि लदाखमधील सैनिक हॉस्पिटलमध्ये त्यांनी मुख्य शल्यचिकित्सक म्हणूनही काही काळ सेवा केली. आपल्या आयुष्यात केलेली समाजसेवा लक्षात घेऊन त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना हा सन्मान देऊन त्यांच्या नावाचा गौरव करण्यात येत आहे.