आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: अशी आहे 'रॉकस्टार बाबा'ची स्टाइल, ज्या रंगाचा टी-शर्ट तसेच बूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदोर- स्पिरिच्युअल फिगर गुरमित राम रहिम सिंह आपल्या आगामी 'मेसेंजर ऑप गॉड एमएसजी' सिनेमाच्या प्रमोशन करण्यासाठी बुधवारी इंदोरला पोहोचले होते. येथे त्याच्या स्टाइलने सर्वांना थक्क केले. त्यांनी ज्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला होता, त्याच रंगाचे बूटसुध्दा घातलेले होते. लोकांचा त्यांचा ही स्टाइल खूप भावली.
बंदूक पाहून राम रहिम यांच्या गार्ड्सना एअरपोर्टवर रोखले
डेरी सच्चा सौदाचे प्रमुख संत राम रहिम यांच्या गार्ड्सना बुधवारी (7 जानेवारी) दुपारी एअरपोर्टवर रोखण्यात आले. त्यांच्याकडे सुरक्षेसाठी एके-47 आणि कार्बाइन गनसारखे हत्यार होते. परंतु विमानाने ही हत्यारे घेऊन जाण्यास फ्लाइट मूव्हमेन्ट ऑर्डर नव्हते. सीआयएसएफ यांनी आदेश मागितल्यानंतर हरियाणा पोलिसांच्या केवळ तीन गार्ड्सने फॅक्सवर आदेश दिले. परंतु पंजाब पोलिसांच्या तीन गार्ड्सचे आदेश दिले नाही. त्यामुळे त्यांना विमानाने जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांना रस्त्याव्दारे रवाना व्हावे लागले.
संत राम रहिम आपल्या सिनेमाच्या प्रचारासाठी 22 लोकांसोबत बुधवारी सकाळी विशेष विमानाने इंदोरला आले होते. स्थानिक कार्यक्रमात सामील झाल्यानंतर ते दुपारी तीन वाजता एअरपोर्टवर पोहोचले. त्यांना येथून दिल्लीला रवाना व्हायचे होते. त्यांच्या टीममध्ये 9 गार्ड्स होते. त्यामध्ये तीन पंजाब पोलिसचे, तीन हरियाणा आणि तीन खासगी गार्ड्स होते.
पंजाब आणि हरियाणा पोलिसांच्या गार्ड्सजवळ एकूण चार एके-47 आणि 2 कार्बइन बंदूका होत्या. तसेच, खासगी गार्ड्सकडे तिन पिस्तूल होत्या. हत्यारे असल्याने या गार्ड्सना टर्मिनलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. यावर सर्वांनी आपला परवाना दाखवला.
सीआयएसएफ आधिका-यांनी सांगितले, की खासगी गार्ड्सकडे पिस्तूल आहेत. गार्ड्स त्याची सर्व माहिती एका पत्रात पायलटल सांगून जाऊ शकता. मोठ्या हत्यारांसाठी फ्लाइट मूव्हमेन्ट ऑर्डर दाखवणे गरजेचे आहे.
चार तास झाले परेशान
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान राम रहिम आणि त्यांचे समर्थकांनी अनेकदा एअरपोर्ट व्यवस्थापन आणि सीआयएसएफ यांच्या जाण्यासी परवानगी मागितली. परंतु त्यांचे म्हणणे फेटाळले. संत आणि त्यांचे समर्थक एअरपोर्टवर जवळपास चार तास परेशान झाले.
हरियाणा पोलिसांच्या गार्ड्स बोलावले आदेश
विमानतळावर मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सर्व गार्ड्स म्हणायला लागले, ती विना आदेश ते दिल्ला आहे तर विना आदेश त्यांना जाऊ द्यावे. परंतु सीआयएसएफच्या अधिकारी तयार झाले नाही. यावर दोन पोलिसांच्या गार्ड्सनी पंजाब आणि हरियाणाला संपर्क करून आदेश
फॅक्श करण्याची मागणी केली.
संध्याकाळी साडे सहा वाजता हरियाणा पोलिसांनी तीन गार्ड्सचे दोन एके-47 आणि एक कार्बाइन गनचे परवाना हरियाणामधून फॅक्सवर आले. परंतु पंजाबमधून परवाना आले नाहीत. त्यामुळे पंजाब पोलिसांच्या गार्ड्सने रस्त्याच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बा राम रहिम यांची विविध स्टाइलची छायाचित्रे...