आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रॉकमध्ये मराठी माणसाचा झेंडा पहिल्यांदा फडकवणारे प्रयोगशील संगीतकार नंदू भेंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज (11 एप्रिल) सकाळी 10च्या सुमारास निधन झाले. ते 61 वर्षीचे होते. नंदू भेंडे यांनी भावगीतांच्या काळात लोकांना रॉक गाण्यांची ओळख करुन दिली.
ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे आणि डॉ. आशा भेंडे यांचे ते चिरंजीव होते. अदि मर्झबान निर्मित नाटकांमुळे आणि 'तीन पैशाचा तमाशा’ या मराठी नाटकातील संगीत भूमिकेमुळे नंदू भेंडे प्रसिद्ध झाले होते.
नंदू भेंडे यांनी 1980 मध्ये आलेल्या 'डिस्को डान्सर' आणि 'चमत्कार' या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते. आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. 'चंद्रकांता', 'जिना इसी का नाम है', 'दायरे' यांसारख्या काही मालिकांनाही त्यांनी संगीत दिले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संगीतवर्तुळात शोककळा पसरली आहे.