आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer Wants To Watch Amir Khans Upcoming Pk

आमिरचा \'पीके\" मला देखील बघायचा आहे - रॉजर फ़ेडरर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररनेदेखील आमिर खानचा आगामी चित्रपट "पीके" पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या फेडरर इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग(आईपीटीएल) खेळण्यासाठी भारतमध्ये आला आहे.
फेडरर "पीके" चे पहिले पोस्टर पाहून प्रभावित झाला आणि त्याने आमिर खानला सांगितले की, मला हा चित्रपट बघायचा आहे. दरम्यान आमिर खानच्या खासगी प्रवक्त्याने सांगितले की, 'ज्यावेळी रॉजरची अमिर सोबत भेट झाली त्यावेळी सर्वात पहिले 'पीके' चा विषय काढला.
फेडररने भारतात आल्यानंतर दीपिका पादुकोण, आमिर खान, अमिताभ बच्चन आणि सुनिल गावस्कर यांच्या सोबत टेनिस मॅच खेळण्याचा आनंद घेतला. तसेच दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबत डान्सची मजा लूटली. यावेळी तेथे अक्षय कुमार आणि रितेश देशमुख देखील उपस्थित होते.