आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Shetty To Direct ‘Ram Lakhan’ Remake For Karan Johar

लवकरच बनणार 'राम लखन'चा रिमेक, पाहा 25 वर्षांत किती बदलले हे स्टारकास्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिग्दर्शक सुभाष घई, करण जोहर आणि रोहित शेट्टी)

मुंबई:
27 जानेवारी 1989 रोजी रिलीज झालेला सुभाष घई यांचा सुपरहिट 'राम-लखन' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. याचे कारण या सिनेमाचा रिमेक बनवण्यात येणार असल्याच्या बातम्या. करण जोहरने या सिनेमाचे सुभाष घई यांच्याकडून सर्व अधिकार 5 कोटींमध्ये खरेदी केले आहेत. आता या सिनेमाचा रिमेक रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार आहे. 2016मध्ये सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
सुभाष घई यांचा मल्टिस्टारर सिनेमात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासह राखी, माधुरी दीक्षित, डिंपल कपाडिया, गुलशन ग्रोव्हर, अमरीष पूरी, परेश रावल, अनुपम खेर, सईद जाफरी, रजा मुराद, दलीप ताहिल, अन्नू कपूर, सोनिका गिल, आनंद बलराज, सतीश कौशिकसह इतर स्टार्सदेखील झळकले होते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, करण जोहरच्या 'राम लखन'मध्ये सिध्दार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन राम-लखनच्या मुख्य भूमिकेत असू शकतात.
'राम-लखन'च्या रिमेकमध्ये होणार आव्हान
सुभाष घई यांच्या 'राम लखन'ची कहानी सुपरहिट होती. तसेच, सिनेमाची गाणीदेखील आजही कानी पडतात. त्यामुळे करण जोहरला या सिनेमाचा रिमेक बनवणे एक आव्हान ठरणार आहे. कारण अनेक जून्या सिनेमांचे रिमेक प्रेक्षकांनी नाकारले आहेत. नवीन 'राम-लखन' सिनेमा जेव्हा प्रेक्षकांच्या समोर येईल तेव्हा ते जून्या नवीन स्टार्सची तुलना स्टारकास्टची करतील हे नक्की.
जूना सिनेमा रिलीज होऊन 25 वर्षे उलटली आहेत. आम्ही तुम्हाला या सिनेमीतील जून्या स्टारकास्ट काही छायाचित्रे दाखवणार आहोत. या 25 वर्षांमध्ये या स्टार्सच्या लूकमध्ये किती बदल झाला ते पाहा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'राम-लखन'मधील स्टार्समध्ये किती बदल झाला...