आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ROHIT SHETTY'S SINGHAM RETURNS WILL RELEASE ON DIWALI

दिवाळीच्या मुहूर्तावर 'सिंघम...' प्रेक्षकांच्या भेटीला, रोहितच्या ACTIONची दिसणार कमाल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शेट्टी आपल्या आवडत्या फेस्टिव्हल अर्थातच दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा 'सिंघम रिटर्न्स'च्या माध्यमातून थिएटर्सना हिट करण्याच्या मार्गावर आहे. रोहित आणि अजयने ठरवलेल्या वेळापत्रकापूर्वीच सिनेमाचे शुटिंग पूर्ण केले आहे.
सिनेमा संबंधित एका सुत्राने सांगितले, की रोहित आणि अजयने मिळून सिनेमाची मुख्य अभिनेत्री करीना कपूर खानसोबत काही महिन्यांपूर्वी शुटिंग केली आणि सिनेमाचे अ‍ॅक्शन सीन्स ठरलेल्या वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहेत. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. अलीकडेच, सिनेमाची पूर्ण टीम 15 दिवसांसाठी गोव्याला गेली होती. परंतु शुटिंग 13 दिवसांत पूर्ण झाल्याने टीम लवकर परतली.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, रोहित आणि अजय दिवस-रात्र शुटिंग करून लवकरात-लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. अजय देवगण आणि रोहित शेट्टीच्या जुगलबंदीचा हा नववा सिनेमा आहे.
यापूर्वी अजय आणि रोहितची जोडी 'जमीन', 'गोलमाल' सीरिजच्या सिनेमांमध्ये, 'सिंघम', 'बोल बच्चन', 'ऑल इज वेल', 'संडे' आणि 'सिंघम रिटर्न्स'मध्ये दिसणार आहेत. यामधील 'जमीन' सिनेमा सोडला तर रोहित आणि अजयला बॉक्स ऑफिसवर सर्वच सिनेमांमध्ये फायदा झाला आहे.
'सिंघम रिटर्न्स' रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली 2011मध्ये आलेल्या 'सिंघम'ची श्रृखंला आहे. यापूर्वी रोहित शेट्टी आणि अजय देवगणच्या जोडीने 'गोलमाल' श्रृखंलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना लोटापोट हसवले आहे.
'सिंघम रिटर्न्स' बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार हे आता येणारी वेळच सांगेल. परंतु या सिनेमाची दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना अतुरतेने प्रतिक्षा राहिल.
'सिंघम'च्या यशानंतर रोहितने याचा सिक्वल बनवण्याचा निर्णय घेतला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा 'सिंघम रिटर्न्स'च्या सेटवरील शुटींगची निवडक छायाचित्रे...