आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Romantic Pictures Of Hrithik Roshan And Suzanne Khan

PIX :हृतिक-सुझानमध्ये दिलजमाई होणे अशक्य, एकेकाळी असा करायचे रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान रोशन यांचा घटस्फोट होणे निश्चित झाले आहे. अलीकडेच या दोघांनीही बांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. 31 ऑक्टोबर रोजी होणा-या सुनावणीत या दोघांना घटस्फोट मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष सामंजस्याने घटस्फोट घेत असल्यामुळे या घटस्फोटाच्या प्रक्रियेला फार काळ लागणार नाही.
तसे पाहता हृतिक आणि सुझान यांच्या कुटुंबीयांनी दोघांचे नाते टिकून राहावे, यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. घटस्फोटाचा निर्णय सुझानचा असल्याचे हृतिकचे म्हणणे आहे. गुगल हँगआउटवर हृतिकने आपल्या एका चाहत्याला सांगितले होते, "सुझानसोबत जे काही घडतंय, त्याला स्वतः तीच जबाबदार आहे."
17 वर्षे जुने नाते येणार संपुष्टात...
हृतिक आणि सुझानमध्ये ताणतणाव असल्याच्या तसेच ते दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत होत्या. घटस्फोट घेणार असल्याचे सांगितल्यावरही हृतिकचे पत्नी सुझानच्या घरच्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते दोघे परत एकत्र येणार असल्याची चर्चा होती. पण, आता तसे होत नसून दोघांनी विभक्त होण्याचेच ठरवले आहे. चार वर्षांच्या प्रेमानंतर 2000 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. 17 वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यात काडीमोड झाली. हृतिक आणि सुझानला रिहान आणि हृदान अशी दोन मुले आहेत.
रोमँटिक कपल म्हणून व्हायची गणना...
हृतिक आणि सुझान आता कायदेशीररित्या विभक्त होत आहेत. मात्र एकेकाळी त्यांनी रोमँटिक अंदाजात एकत्रितपणे आपले आयुष्य व्यतित केले. दोघांमधील प्रेमाची झलक अनेकदा सार्वजनिकरित्या त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. सार्वजनिक ठिकाणी हे दोघे बिनधास्तपणे एकमेकांना किस करताना आढळून आले होते.
असो, हृतिक आणि सुझानच्या उदाहरणावरुन बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत नाती टिकवणे खूप अवघड असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
एक नजर टाकुया हृतिक-सुझानच्या रोमँटिक क्षणांवर...