आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई टीव्ही मराठी वाहिनीवरील 'विवाहबंधन' या मालिकेत आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे रोमँटिक ट्रॅक. कारण सागर आणि मुक्तामध्ये आता प्रेमाचे वेगळे बंध निर्माण झाले आहेत.

आपल्या साथीदाराची साथ आपल्याला सदैव लाभावी. त्याचं प्रेम आपल्याला मिळावं असं प्रत्येक बायकोला वाटत असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून मुक्ता सागरच्या आयुष्यात आली होती. सागर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुखासाठी मुक्ता खूप झटली. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा त्याला मुक्ताने मोठ्या धीराने तोंड दिलं. मग ते सागरची सेवा करणे असो किंवा त्याला रियाच्या जाळ्यातून वाचवणे असो. शेवटी विजय सत्याचाच होतो, असे म्हणायला हरकत नाही. सागरलासुद्धा आता मुक्तावर असलेल्या प्रेमाची जाणीव होऊ लागली आहे. मुक्ता आणि सागर यांच्या नव्या नात्याची आता ख-या अर्थाने सुरुवात झाली, असे म्हणता येईल.