आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Family Tree : भेटा रोशन फॅमिलीला, जाणून घ्या कोणकोण आहेत हृतिकच्या कुटुंबात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिकचे कुटुंब (डावीकडून)- हृतिकची आजी इरा, आई पिंकी, आजोबा रोशनलाल, हृतिक, बहीण सुनैना, पापा राकेश, पत्नी सुझान, मुले हृहान आणि हृदान (व्हाइट टी-शर्ट)
बॉलिवूडमध्ये रोशन कुटुंबाचा उल्लेख होताच हृतिक रोशनचे नाव सर्वांच्या ओठांवर येतं. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी फिल्म इंडस्ट्रीतील जेवढी लोकप्रियता प्राप्त केली, त्याहीपेक्षा लोकप्रिय हृतिक ठरला. बॉलिवूडच्या सुपरस्टार्सपैकी तो एक आहे. अलीकडेच पत्नी सुझानसोबतचे हृतिकचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले आहे. दोघांना यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कायदेशीर घटस्फोट मिळणार आहे.
सुझान संजय खान यांची कन्या आहे. रोशन कुटुंबाप्रमाणेच खान कुटुंबाचासुद्धा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. त्यामुळे जेव्हा हृतिक आणि सुझानचे लग्न झाले, तेव्हा हे दोन कुटुंब बॉलिवूडमधील मोठे कुटुंब बनले. रोशन कुटुंबातील राकेश आणि हृतिक यांनाच लोक जास्त ओळखतात. रोशन कुटुंबाविषयी लोकांना फारसे ठाऊक नाहीये. अगदी त्याचप्रमाणे खान कुटुंबाविषयीसुद्धा लोकांना फारसे माहित नाही.
रोशन-खान कुटुंबात अनेक स्टार आहे. यामध्ये हृतिक रोशनसह फरदीन खान, जाएद खान, राकेश रोशन, राजेश रोशन, फिरोज खान, संजय खान या नावांचा समावेश आहे.
आमच्या 'KNOW स्टार परिवार सीरीज' अंतर्गत आम्ही तुम्हची भेट रोशन कुटुंबातील सदस्यांशी करुन देत आहोत. याशिवाय खान कुटुंबासोबत नाते जोडल्यानंतर हे कुटुंब किती मोठे झाले तेही सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या रोशन-खान कुटुंबातील सदस्यांविषयी...