आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rumour: Priyanka Chopra & Farhan Akhtar Having An Affair

प्रियांका- फरहानच्या अफेअरची अनुष्काने पसरवली अफवा, पीसी झाली नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर
मुंबई: फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. यावेळी प्रियांका चोप्रासुध्दा या चर्चेमध्ये आली आहे. अलीकडेच, एक बातमी आली होती, की 'दिल धडकने दो'च्या शूटिंगवेळी प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्यात जवळीक वाढली आहे. असेही ऐकिवात आहे, की प्रियांका अशा बातम्यांमुळे थोडी नाराज दिसत आहे.

इंडस्ट्रीशी संबंधित एका सूत्राच्या सांगण्यानुसार, अफवा पसरवण्या मागे अनुष्का शर्माचा हात आहे. 'दिल धडकने दो'चे सर्व स्टारकास्ट क्रूजमध्ये (बार्सिलोनामध्ये) शूटिंग करत असताना अनुष्काने अशा अफवा पसरल्या. जेव्हा प्रियांकाला हे माहित झाले तेव्हा ती अनुष्कावर खूप नाराज झाली. प्रियांकाला सुरुवातीला यावर विश्वास बसला नाही. नंतर तिला याविषयी कळाले तेव्हा तिने अनुष्काशी दुरावा वाढवला आहे.
अनुष्कासह प्रियांकाची चांगली बाँडिंग
बार्सिलोनाच्या क्रूजमध्ये 'दिल धडकने दो'ची शूटिंग चालू असताना प्रियांका आणि अनुष्का यांच्यात चांगली बाँडिंग दिसून आली होती. त्या जास्तित-जास्त वेळ एक६ घालवत होत्या. प्रियांकाने नुकतेच टि्वटरवर 'दिल धडकने दो'चा एक फोटो पोस्ट करून लिहिले होते, 'बेस्ट क्रू एव्हर'. या फोटोमध्ये फरहान अख्तर, रितेश सिधवानीशिवाय अनुष्का शर्मासुध्दा होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'दिल धडकने दो'ची ONLOCATION PICS...