मुंबईः ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त सोमवारी सोशल नेटवर्किंग साइट्सवर वा-यासारखे पसरले होते. ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिनेते
अमिताभ बच्चन यांनी ही बातमी खोटी असून दिलीप साहेबांच्या चाहत्यांनी चिंता करु नये, असे सांगितले आहे.
बिग बींनी
ट्विटर आणि
फेसबुक अकाउंटवर लिहिले, "यूसुफ साहेब-दिलीप कुमार आजारी असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत... चुकीचे... सायराजींनी मला आता मेसेज करुन सर्वकाही ठिक असल्याचे कळवले आहे."
कशी पसरली अफवा...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने दिलीप साहेबांविषयीची एक जुनी बातमी रिट्विट केली, त्यामुळे ही अफवा पसरली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एका चाहत्याने बिग बींना ट्विट करुन दिलीप साहेबांविषयी केलेली विचारणा आणि सोबतच पाहा फेसबुक आणि ट्विटरवर बिग बींनी दिलेला मेसेज...