आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जुन्या 'महाभारत'मधील द्रौपदी, 3 वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, जाणून घ्या का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'महाभारत' हे भारतीय पौराणिक महाकाव्य आहे. महाभारताची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महाकाव्यावर 25 वर्षांपूर्वी एक टीव्ही मालिका बनवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही कहाणी स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होत आहे.
जुन्या महाभारतमध्ये टीव्ही अभिनेत्री रुपा गांगुलीने द्रौपदीची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप दमदार होती. या पौराणिक मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारुन अभिनेत्री रुपा गांगुली प्रसिद्धीझोतात आली होती. या भूमिकेमुळे तिला स्टारडम मिळाले होते. मात्र प्रसिद्धी, नाव, पैसा मिळवणा-या रुपाचे खासगी आयुष्य अनेक चढउतारांचे राहिले.
प्रेक्षकांची मिळाली होती पसंतीची पावती...
1988 साली दूरदर्शनवर सुरु झालेल्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत रुपा गांगुली द्रौपदीच्या भूमिकेत झळकली होती. बी.आर. चोप्रा यांच्या या मालिकेमुळे रुपा अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. द्रौपदीच्या भूमिकेमुळे नाव, प्रसिद्धी, पैसा कमावणा-या रुपाला मात्र ती एक चांगली अभिनेत्री नसल्याचे वाटत होते.
रुपाच्या मते, अभिनय कसा करावा, हे तिला ठाऊक नव्हते, मात्र प्रत्यक्षात ती द्रौपदीची भूमिका साकारत होती. शिवाय तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंतीची पावतीसुद्धा मिळत होती.
अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे रुपा...
रुपा गांगुलीला टेलीवूडमधील अनेक मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. रुपा गांगुलीने सांगितले, की तिने अभिनेत्री होण्याचा विचार कधीच केला नव्हता. मात्र अपघाताने ती या क्षेत्रात आली. द्रौपदीची भूमिका मिळवण्यासाठी तिला बरेच कष्ट घ्यावे लागले होते.
रुपा बॉलिवूडमध्ये 'साहेब' (1985), 'एक दिन अचानक' (1989), 'प्यार के देवता' (1990), 'बहार आने तक' (1990), 'सौगंध' (1991), 'निश्चय' (1992) आणि 'बर्फी' (2012) या सिनेमांमध्ये झळकली आहे. रुपा गांगुली एक चांगली गायिकासुद्धा आहे. तिला पार्श्वगायनासाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.
तीनदा केला आत्महत्येचा प्रयत्न...
रुपाने आपल्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार बघितले. वैवाहिक आयुष्यात तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या कारणामुळे ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आणि काही वर्षांत घटस्फोट घेतला. खरं तर रुपाने आपल्या पतीसाठी अभिनयाला रामराम ठोकला होता आणि लग्नानंतर ती त्याच्याबरोबर कोलकत्याला स्थायिक झाली होती. ती लग्नानंतर हाऊसवाईफ झाली. मात्र तिला तिच्या दैनंदिन खर्चासाठी नव-याकडून पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात खटके उडायचे. रोजच्या त्रासाला कंटाळून रुपाने तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
विवाहबाह्य संबंध होते....
'सच का सामना' या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर रुपाने आपल्या खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी उघड केल्या. रुपाने सांगितले, की महाभारत या मालिकेत काम करत असताना, तिचे विवाहबाह्य संबंध होते.
याशिवाय आपण तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे तिने या कार्यक्रमात सांगितले होते. एवढी वर्षे आपल्या मनात दाबून ठेवलेल्या गोष्टी उघड केल्याने समाधानी वाटत असल्याचे तिने यावेळी म्हटले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रुपा गांगुलीची खासगी आयुष्यातील छायाचित्रे...