आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढासळत्या रुपयाची झळ ‘मिक्ता’ला; स्वित्झर्लंडऐवजी आता मकाऊत रंगणार सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठी नाटक आणि मराठी चित्रपटातले वेधक-वेचक- निवडक कलाविष्कार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिमाखदार पद्धतीने प्रेझेंट करणारा मिक्ता पुरस्कार सोहळा आता स्वित्झर्लंडऐवजी मकाऊ (चीनचा प्रशासकीय प्रदेश) येथे होणार आहे. ढासळत्या रुपयाची झळ या महोत्सवाच्या युरोपातील आयोजनाला थेट बसली असून, आयत्या वेळी सोहळ्याचे ठिकाण आयोजकांना बदलावे लागले आहे. आर्थिक कारणांसाठी सांस्कृतिक सोहळे रद्द होणे वा ठिकाण बदलावे लागण्याचे गेल्या वर्षभरातील हे तिसरे उदाहरण आहे.

यापूर्वी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन कॅनडामधील टोरँटो येथे होणार होते. मात्र आयत्या वेळी अधिक मंडळींचा भार उचलण्यास स्थानिक आयोजकांनी नकार दिल्याने हे संमेलन होऊ शकले नाही. लंडन येथील विश्व साहित्य संमेलनाबाबतही स्थानिक आयोजकांनी आर्थिक असमर्थता दश्रवल्याने ते रद्द करावे लागले होते.

यासंदर्भात काय म्हणाले महेश मांजरेकर जाणून घ्या..