आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवणारे अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या एकुलत्या एक कन्येलासुद्धा आता मोठा पडदा खुणावू लागला आहे. श्रियानेदेखील आपले आईवडील सचिन आणि सुप्रियाप्रमाणेच अभिनयात कारकिर्द करायची ठरवली आहे. लवकरच श्रियाची प्रमुख भूमिका असलेला मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
सचिन पिळगांवकर आपल्या लाडक्या कन्येला 'एकुलती एक' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर लाँच करत आहेत. 'एकुलती एक’ या सिनेमात एक मुलगी आणि तिच्या वडीलाची कथा रेखाटण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या या पहिल्याच सिनेमात ती तिचे वडील सचिन पिळगांवकर याच्यासोबत काम करणार आहे.
सचिन पिळगांवकर हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाद्वारे सचिन फिल्म मेकींगची आधुनिक स्टाईल लाँच करणार आहेत. अभिनेता स्वप्नील जोशी गेस्ट अपिअरन्स मध्ये या सिनेमात दिसणार आहे.
तसे पाहता श्रिया या सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करीत असली तरी ती या क्षेत्रात नवखी नाही. ती एक फेल्ममेकर असून तिने दिग्दर्शित केलेल्या ‘ड्रेसवाला’ आणि ‘पेंटेड सिग्नल’ यासारख्या शॉर्ट फिल्म्सना अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये दाद मिळाली आहे.
चला तर आपल्या आईवडिलांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा श्रियाला तिची कारकिर्द घडवण्यात मदत करेल अशी आशा व्यक्त करायला काहीच हरकत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.