आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन खेडेकरांबरोबर हॉट सीटवर बसणार प्रेक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कौन बनेगा करोडपती' आता 'कोण होईल मराठी करोडपती' या नावाने मराठीत येतंय ही बातमी आम्ही दिव्यमराठी.कॉमच्या वाचकांना आधीच दिलीय. आता या शोच्या संदर्भातील नवी बातमी आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलोय.

अमिताभ बच्चन यांनी गाजवलेल्या 'केबीसी'च्या मराठी आवृत्तीत हा शो कोण होस्ट करणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. चला तर मग ही उत्सुकता जास्त ताणून न धरता आम्ही तुम्हाला 'कोण होईल मराठी करोडपती'च्या सुत्रसंचालकाचे नाव सांगतो. हे नाव आहे अभिनेता 'सचिन खेडेकर'. होय सचिन खेडेकर 'कोण होईल मराठी करोडपती'चे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना हॉट सीटवर सचिन खेडेकरांबरोबर बसण्याची संधी मिळणार आहे.

हिंदीत अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोला वलय मिळवून दिले होते. आता मराठीतदेखील सचिन खेडेकरांच्या उपस्थितीने केबीसीचा गेम चांगलाच रंगेल अशी आशा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. सध्या या शोची तयारी चालू झाली असून येत्या मे महिन्यात हा शो सुरु होणार आहे. सचिन यांनीसुद्धा या कार्यक्रमासाठी सराव सुरू केला आहे.

सो फ्रेंड्स सचिन खेडेकरांबरोबर 'केबीसी'चा हा गेम खेळायला सज्ज व्हा.