आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Says, Yellow Is Truly Inspiring Movie...

सचिन तेंडूलकर म्हणतो 'यलो' म्हणजे इन्स्पिरेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवघ्या महाराष्ट्रात काही दिवसात एक नाव चर्चेचा उत्सुकतेचा आणि कौतुकाचा विषय ठरलंय ते म्हणजे 'यलो'. अंबर गणेश लिखित, उत्तुंग हितेंद्र ठाकूर, रितेश देशमुख निर्मित आणि महेश लिमये दिग्दर्शित 'यलो' सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग अलीकडेच आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगचे खास आकर्षण होतं गॉड ऑफ क्रिकेट अर्थात सचिन तेंडुलकरची विशेष उपस्थिती. 'यलो' हा सिनेमा स्पेशल मुलांवरचा अत्यंत धमाल आणि इंस्पायरिंग आणि स्पोर्ट्सशी निगडीत असल्याने सचिन तेंडुलकरला खास आमंत्रण देण्यात आलं होतं.
आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत 'यलो' सिनेमा एन्जॉय केल्यानंतर सचिनची पहिली प्रतिक्रिया त्याने गौरीला दिली. सचिन म्हणाला, ''गौरी मी क्रिकेट खेळतो पण तुझं स्विमिंगमधलं कर्तुत्व बघून आता मलासुद्धा स्विमिंग शिकायचं आहे.''
'यलो' च्या प्रत्येक कलाकाराचं आणि तंत्रज्ञाच सचिनने भरभरून कौतुक केल. 'यलो'चं स्पेशल स्क्रीनिंग आपल्यासमोर होतंय हे आमचं भाग्य आहे असं महेशने म्हणताच सचिन प्रांजळपणे म्हणाला, ''यलो सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग बघायचा मान आम्हाला दिल्याबद्दल खरंतर आम्ही 'यलो' टीमचे आभार मानायला हवेत".
'यलो' टीमसाठी सचिनशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासोबत एक संस्मरणीय गोष्ट आहे आणि ती म्हणजे यलो पोस्टरवरील सचिनचे स्वहस्ताक्षरातील शब्द Chased her dreams & they come true.... Truly inspiring movie...
पुढील स्लाईड्सवर पाहा 'यलो' सिनेमाच्या टीमसोबत सचिन तेंडुलकर...