(दिवंगत सदाशिव अमरापूरकर यांचे पडद्यावरील वेगवेगळे लूक्स..)
रंगभूमी, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मात्र
आपल्या भूमिकांच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्यात असतील. 'सडक' या हिंदी सिनेमातील तृतीयपंथीयाची असो किंवा 'आँखे' मधील विसराभोळ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका, त्यांनी आपली प्रत्येक भूमिका पडद्यावर जिवंत केली.
आपल्या करिअरमध्ये त्यांनी अडीचशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. 'अर्धसत्य', 'पूराना मंदिर', 'नसूर', 'मुदत', 'वीरू दादा', 'सडक', 'जवानी', 'फरिश्ता', आँखे, 'कुली नंबर वन', 'इश्क', 'कालचक्र', 'हम साथ साथ है' हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सदाशिव अमरापूरकर यांचे सिनेमातील वेगवेगळे लूक्स दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा क्षणात हसवणारे, रडवणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सिनेमातील वेगवेगळे लूक्स...