आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा कसला समान मानवाधिकार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानने अलीकडेच ‘ह्यूमन बीइंग’ नावाची एक संस्था स्थापन केली आहे. ही संस्था त्याने तयार केलेल्या वस्तू विकणार आहे. सलमान खान बर्‍याच वर्षापासून ‘बीइंग ह्यूमन फाउंडेशन’ची संस्था चालवत आहे. या संस्थेत डिझायनर घड्याळ, टी-शर्ट आणि पेंटिंग इत्यादी वस्तू विकल्या जातात. आपल्या अभिनयातून मिळालेला पैसा सलमान गरिबांचा उपचार आणि शिक्षणावर खर्च करतो.
सलमानच्या संस्थेने 2011 ते 2012 या एका वर्षात 7 कोटी 10 लाख रुपयांची रुग्णांना मदत केली आहे. रुग्णालयांना आणि मेडिकल दुकानांना संस्था चेकद्वारे दान करते, तर गरीब मुलांच्या शाळांमध्ये फी पाठवली जाते. गरिबांचा रुग्णालयात व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सलमानने डॉ. चोप्रा यांची नियुक्ती केली आहे. या कामासाठी बिभाष यांनादेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबई आणि जवळपासच्या गरिबांनाच याची मदत मिळत आहे. डॉ. चोप्रा आणि बिभाष यांचे म्हणणे आहे की, संस्थेजवळ खूपच कमी पैसा आहे. यातही 90 टक्के रक्कम सलमान देतो शिवाय उत्तम झंवरसारख्या काही लोकांनीही मदत दिली आहे. त्यातून पूर्ण भारताच्या गरिबांची मदत केली जाऊ शकत नाही.
सलमान खान आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्याच्या घरासमोर सकाळी रुग्णांची गर्दी जमते. त्याची संस्था इतर संस्थाच्या संपर्कात असते आणि एकत्र काम करते. गेल्या वर्षी सलीम साहेबांच्या उपचारासाठी काही खर्च आला होता; पण कुटुंबाच्या लोकांनी सलमानच्या संस्थेकडून नंतर मदत घेतली नाही, तर सलीम साहेबांनी स्वत:ची कमाई उपचारावर खर्च केली.
शाहरुखच्या संस्थेचा उद्देश काय आहे याची माहिती अजून मिळालेली नाही; पण त्यानेदेखील नानावटी रुग्णालयाच्या एका विभागाला मदत केली आहे. ही संस्थादेखील अनेक मदतकार्य करत असावी. शाहरुखने आपल्या संस्थेचे नाव सलमानच्या संस्थेशी मिळतेजुळते का ठेवले आहे. हा लक्षवेधी मुद्दा आहे. ‘ह्युमन’ शब्दावर सलमानचाच एकाधिकार आहे असे नाही. सलमाननेदेखील तसा दावा केलेला नाही; पण शाहरुख आपल्या संस्थेचे दुसरे काही नाव ठेवू शकला असता. दोन सारख्या व्यवसायात असलेले लोक, दोन सारख्याच नावाच्या संस्था का चालवत आहेत?
हा काही सामाजिक किंवा कायदेशीर गुन्हा नाही तथापि वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. मात्र, एक गोष्ट निश्चित की शाहरुखच्या विचारांमध्ये सलमान असतो. यातही काही वाईट नाही. एकेकाळी ते दोघे चांगले मित्र होते. आपल्या संघर्षाच्या दिवसात शाहरुख सलमानच्या घरी येत-जात होता आणि त्याच्या कुटुंबाशी भेटतही होता. त्यांच्यात पहिले भांडण ‘देवदास’च्या नायिकेवरून झाले होते तर दुसरे भांडण कॅटरिना कैफच्या वाढदिवसावेळी झाले. काळ कसा बदलला बघा, आता यश चोप्राच्या आगामी चित्रपटात शाहरुखसोबत कॅटरिना कैफ आहे.
एकेकाळी शाहरुखचे चित्रपट हिट होत होते आणि सलमानचे चित्रपट फ्लॉप व्हायचे. तरीसुद्धा सलमानच्या मनात कटुता नव्हती. या आधुनिक हातिमताईने कधीच हिट किंवा फ्लॉपची पर्वा केली नाही; पण गेल्या काही महिन्यांमध्ये सलमानच्या चित्रपटांना हवे तसे यश मिळाले आणि शाहरुखच्या चित्रपटांना अपयश चाखावे लागले. एका जमान्यात दोघांनी राकेश रोशन यांचा ‘करण-अर्जुन’ आणि केसी बोकाडिया यांचा ‘हम तुम्हारे हैं सनम’ चित्रपटात सोबत काम केले होते, तर करण जोहरच्या ‘कुछ-कुछ होता है’मध्ये सलमान खानची विशेष भूमिका होती.
शाहरुख खान त्याचा मित्र अजीज मिर्झाच्या मुलांसाठी काही करत असल्याचे कळते त्याने यासाठी कुंदन शाहची भेटदेखील घेतली आहे. आता तो वादांपासन दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. एकेकाळी तो अमरसिंह आणि अमिताभ बच्चन यांच्यावरदेखील नाराज होता. असो, त्यादिवशी वानखेडे स्टेडियमच्या मैदानावरून त्याच्या मुलांना हटवण्यात आले, कारण तेथे कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सुरक्षा कर्मचार्‍यांनी मुलांना हात लावला. आपल्या मुलांना स्पर्श केल्याने शाहरुख भडकला होता.
शाहरुखचे यश आर्थिक उदारमतवाद आणि मल्टिप्लेक्सची निर्मिती आहे आणि त्यातील अडचणींमुळेच तो दुखी आहे; पण याच काळात सलमान खान समाजवादी आहे, कारण भारतात कोणतीही वेळ पूर्णपणे निर्णायक राहत नाही.
jpchoukse@bhaskarnet.com
.