आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सई ताम्हणकर झाली 'बाईकर बेब', 'क्लासमेट्स'मध्ये दिसणार टॉमबॉईश लूकमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर आता झाली आहे 'बाईकर बेब'. अजय सरपोतदार दिग्दर्शित 'क्लासमेट्स' या आगामी सिनेमात सई बाईकस्वारी करताना दिसणार आहे. या सिनेमात तिचा टॉमबॉय लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
एका मुलाखतीत सईने सांगितले, ''मला बाईक चालवायला आवडते. कॉलेज जीवनात असताना मी बाईक चालवायची. या सिनेमात माझी भूमिका टॉमबाईश स्वरुपाची आहे. ती एका कॉलेज कट्ट्यावरच्या गँगची सदस्य असते. सर्व मुले बाईक चालवताना पाहून तीसुद्धा बाईक चालवते.''
या सिनेमात सईने बाईकसोबत स्टंट्ससुद्धा केले आहेत. सईसाठी खास स्टंट्स डिझाइन करण्यात आले. या सिनेमात सईसह अंकुश चौधरी, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सिद्धार्थ चांदेकर, पल्लवी पाटील यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सईची बाईकसोबतची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे दिग्दर्शकाने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली आहेत.