Home »Marathi Katta» Sai Tamhankar VALENTINE Interview

VALENTINES SPL : स्वतःच्या हाताने तयार केलेले गिफ्ट अमेयला देणार - सई

वैशाली करोले | Feb 13, 2013, 06:32 AM IST

  • VALENTINES SPL : स्वतःच्या हाताने तयार केलेले गिफ्ट अमेयला देणार - सई

व्हॅलेंटाइन डे म्हणेज प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. हा दिवस आपले सेलिब्रिटी कसा साजरा करतात हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आज अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या या खास दिवसाबद्दल आपल्या चाहत्यांना सांगत आहे.

''हाय फ्रेंड्स... माझे अमेय गोसावीबरोबर लग्न ठरले आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. सर्वसामान्य कपल्सप्रमाणे आम्ही दोघेही हा दिवस साजरा करतो.

मला असं वाटतं जसजसे आपण मोठे होत जातो, तसेतसे आपण समजूतदार होत असतो. लहान असताना आपण मटेरिअलिस्टीक असतो. मात्र आता जर विचाराल तर मटेरिअलिस्टीक गोष्टी माझ्यासाठी दुय्यम आहेत.

एखाद्या गिफ्टपेक्षा त्याच्याबरोबर संपूर्ण दिवस एकत्र घालवणे, खूपखूप गप्पा मारणे याला मी प्राधान्य देते. गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी आणि अमेयने संपूर्ण जगासमोर आमच्या प्रेमाची कबूली दिली होती. त्यामुळे गेल्यावर्षीचा व्हॅलेंटाइन आमच्या दोघांसाठीही खूपच स्पेशल होता.

यंदाचा आमचा हा दुसरा व्हॅलेंटाइन आहे. यावर्षीचा व्हॅलेंटाइनसुद्धा खूप स्पेशल करण्याचा मी विचार केला आहे. यादिवशी आम्ही दोघेही बाहेर डिनरला जाणार आहोत. अमेयला एखादा परफ्यूम किंवा टी-शर्ट गिफ्ट करण्यापेक्षा स्वतःच्या हाताने तयार केलेले ग्रिटींग किंवा स्वतः लिहिले एक पत्र मी त्याला भेट म्हणून देणार आहे. माझ्या मते, हेच अमेयसाठी स्पेशल गिफ्ट ठरेल.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मी एवढेच म्हणेल की, तुम्ही जर एखाद्यावर प्रेम करत असला तर जीवापाड प्रेम करा आणि खरे प्रेम करा. तुमचा जोडीदार जसा असेल तसे त्याला स्वीकारा. त्याला स्वतःसाठी किंवा तुम्ही त्याच्यासाठी स्वतःला बदलू नका. तुम्हालासुद्धा व्हॅलेंटाइन डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाइन डे.''

Next Article

Recommended