आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफ-करिनाने सोबत चित्रपट करण्यास दिला नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - करीना कपूर आणि सैफ अली खान)
अथिया शेट्टी आणि सूरज पांचोलीसोबत निखिल अडवाणी 'हीरो'चे शूटिंग करण्यामध्ये व्यग्र आहेत. या शूटिंगदरम्यान तो एका अन्य चित्रपटाच्या दिग्दर्शनावर विचार करत आहेत. यामध्ये सैफ अली खानची प्रमुख भूमिका असणार आहे. मात्र, अभिनेत्री म्हणून अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा करण्यात आली नाही. तरीदेखील निखिलने चित्रपटाची घोषणा करण्याचे धाडस दाखवले आहे. अभिनेत्री म्हणून सुरुवातीला सैफची पत्नी करीनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
सोबत केल्या गेलेल्या अनेक चित्रपटांच्या अपयशी मालिकेमुळे करीनाने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. शिवाय सैफ-करीना आता सोबत काम करण्यास तयार नाहीत. या जोडीला स्क्रीनवर एकत्र पाहणे प्रेक्षकांना आवडत नसल्याचे मागील अनेक अपयशी चित्रपटांवरून दिसून येते. निखिलने सैफची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2015 च्या मध्यात सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. टशन, कुर्बान आणि एजंट विनोद हे या जोडीचे असलेले चित्रपट अपयशी ठरले होते.
पुढे वाचा, अजय-काजोलसुद्धा एकत्र झळकणार नाहीत...