मुंबईः
सैफ अली खान आणि त्याची बेगम
करीना कपूर खान सोमवारी रात्री एक दिसले. दोघेही मुंबईतील वांद्रास्थित रेस्तराँमध्ये डिनर डेटसाठी पोहोचले होते. गेल्या महिन्यात सैफ-करीना दोनदा डिनरसाठी बाहेर आले होते. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी या दोघांनी रेस्तराँमध्ये एकत्र जेवण घेतले होते.
सैफ-करीना रेस्तराँमधून बाहेर पडल्यानंतर मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना घेराव घातला. दोघांनी फोटोग्राफर्सना भरपूर पोज दिल्या. यावेळी करीना ब्लॅक टॉप, ब्लू जीन्स आणि ब्लॅक हाफ जॅकेटमध्ये नेहमीप्रमाणे सुंदर दिसली. तर तिचा नवाब सैफ ब्लू टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. त्याने डोक्याला ग्रीन स्कार्फ बांधला होता,
यावेळी रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत याच रेस्तराँमध्ये डिनरसाठी आला होता. सोबत निर्माते दिनेश विजान आणि केन घोष यांनीही या चौघांसोबत जेवणाचा आनंद घेतला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सैफ-करीनाच्या डिनर डेटची छायाचित्रे...