आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: 34 वर्षांची झाली लाडकी बेबो, पाहा सैफीनाच्या लग्नाचे खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाचे छायाचित्र. एका छायाचित्रात करीना डिझाइनर मनीष मल्होत्रासह)
मुंबई: अभिनेत्री करीना कपूर खान आज तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाच्या बळावर जगभर नाव कमावलेल्या अभिनेत्रींमध्ये करीनाचे नाव सामील आहे. 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या करीनाने ऑनस्क्रिन अनेकदा रोमान्स केला, प्रेम केले आहे. तसेच, रिअल लाइफमध्येसुध्दा प्रेम व्यक्त करण्यात मागे राहिली नाही. करीना ज्याच्यवर प्रेम करत होती त्याच्याशीच तिचे लग्न झाले.
करीनाचे लग्न बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत 16 ऑक्टोबर 2012मध्ये झाले. करीना सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सैफची पहिली पत्नी अमृता सिंह होती. सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करीना आणि त्याचे दिर्घकाळ अफेअर होते. त्यापूर्वी करीनाचे शाहिद कपूरसह अफेअर होते असे बोलले जाते.
सैफ-करीनाची लव्हस्टोरी
सैफ-करीना यांची जोडी सैफीना म्हणून ओळखली जाते. दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'टशन'पासून सुरु झाली होती. त्यानंतर दोघांची भेट आणि जवळिक वाढत गेली. मीडियासमोर आपल्या नाते स्वीकारल्यानंतर दोघे लवकरच लग्नगाठीत अडकले होते.
लग्नात पोहोचले होते दिग्गज मंडळी
छोटा नवाब म्हणून ओळखला जाणारा सैफ अली खान आणि करीन कपूर यांचे लग्न धूमधडाक्यात झाले होते. करीनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला गुलाबी रंगाचा लहंगा परिधान केला होता. तसेच, सैफ अली खान राघवेंद्र राठोड ने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसला होता. लग्नाच्या या भव्य समारंभात खान कुटुंबीयांसह अनेक दिग्गज सामील झाले होते. पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस नेता राहूल गांधी, केंद्रीय मंत्री फारुख अब्दुला, ज्योतिरादित्य सिंधिया, गीतकार प्रसून जोशी, अभिनेत्री नंदिता दास, क्रिकेटर कपिल या दिग्गज मंडळींसह अनेकांनी उपस्थिती लावली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफ-करीनाच्या लग्नाची खास छायाचित्रे...