आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saif Ali Khan And Karina Kapoor Will Get Married On 16 October

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफ-करिना निकाह येत्या 16 ऑक्टोबरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव/मुंबई । अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा निकाह 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सैफची आई शर्मिला टागोर यांनी त्यास दुजोरा दिला आहे. हरयाणातील पटौदी येथे निकाह होईल आणि मुंबईत रिसेप्शन होण्याची शक्यता आहे. पटौदी संस्थानचे दहावे नवाब सैफचा निकाह पटौदीतील वडिलोपार्जित इब्राहीम महालात होईल. सैफचे वडील मन्सूर अली खान यांचे 22 सप्टेंबर 2011 रोजी दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सैफला नवाब करण्यात आले. त्यामुळे निकाह टळला होता. करिना सध्या ‘हिरॉइन’ आणि ‘रेस 2’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. निकाहानंतरही करिना चित्रपटात काम करील, असे शर्मिला यांनी स्पष्ट केले.