आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan And Ritesh Deshmukh\'s Dostana In Humshakals

PICS: \'हमशकल्स\'मध्ये दिसणार सैफ-रितेशचा दोस्ताना?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच साजिद खानच्या 'हमशकल्स' सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे. तीन वेगवेगळ्या पोस्टर्समध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता सैफ अली खान आणि रितेश देशमुखचे विविध अवतार बघायला मिळत आहेत. यामधील एका पोस्टरमध्ये दोघांना बघून अंदाज बांधला जाऊ लागला आहे, की दोघे या सिनेमात समलैंगिक असल्याची भूमिका साकारत आहेत. याविषयी जेव्हा साजिदशी बातचीत केली तर त्याने या गोष्टीचा स्पष्ट नकार दिला.
साजिद म्हणाला, 'माझा सिनेमात कोणतेही पात्र समलैंगिक नाहीये.' परंतु या सिनेमाच्या पोस्टरवरील दृश्य बघून सर्वांना सैफ आणि रितेश समलैंगिक पात्र साकारत असल्याचा भास होणारच आहे. यावर तो म्हणाला, की या भूमिकेत दोघे मम्माज बॉय टाइप आहेत. त्यामुळे त्यांच्या पात्राला तरुणीच्या हावभावांचे थोडे रुप देण्यात आले आहे. त्याने सांगितेल, की सिनेमात दोन्ही स्टार्सच्या तीन-तीन भूमिका आहेत. अर्थातच एक अभिनेता तीन भूमिकेत दिसणार आहे. त्यामधील एक चांगली, दुसरी वाईट आणि तिसरी भूमिका दृष्ट असणार आहे.
त्याने पुढे सांगितले, की सैफ आणि रितेशने आतापर्यंतच्या शुटिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आहे. पहिल्यांदाच हे स्टार्स तीन भूमिकांमध्ये दिसणार आहेत. साजिद म्हणतो, की रितेशसोबत त्याचा हा पाचवा सिनेमा आहे. तो नेहमीच त्याच्यासोबतच्या सिनेमात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. परंतु साजिद पहिल्यांदाच सैफसोबत काम करत आहे. तो म्हणतो, की सैफचा अभिनय बघून तो त्याचा चाहता झाला आहे.
सिनेमाची शुटिंग जवळपास पूर्ण होत आली आहे. हा सिनेमा 20 जून 2014ला रिलीज होऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा नुकतेच समोर आलेले पोस्टर्स आणि काही ऑन लोकेशन्स PICS...