मुंबई - अभिनेता सैफ अली खान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नवाबच्या रुपात अवतरत असतो. मात्र बुधवारी रात्री सैफ आपल्या लूक्सच्या अगदी विरुद्ध दिसला. पहिल्यांदाच सैफचा ड्रेसिंग सेन्स वेगळा दिसला.
झाले असे, की 'लेकर हम दीवाना दिल' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला सैफ पोहोचला होता. यावेळी तो व्हाइट शर्ट आणि बरमूडा परिधान करुन स्क्रिनिंगला आला होता. त्याने ऑरेंज कलरचा बरमूडा घातला होता. त्यावर HDLL असे लिहिले होते. शिवाय पायात त्याने स्लीपर घातली होती. या स्क्रिनिंगला सैफसह दिग्दर्शक होमी अदजानिया यांचीही हजेरी होती.
'लेकर हम दीवाना दिल' हा सिनेमा आरिफ अली यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाद्वारे
करीना कपूरचा आतेभाऊ आणि सैफचा मेव्हणा अरमान जैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या 4 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगमध्ये सहभागी झालेल्या सैफ अली खानच्या नवीन लूकची छायाचित्रे...