आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: रील लाइफसोबत रिअल लाइफमध्येसुध्दा बदलला आहे सैफचा LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तीन विविध लूक्समध्ये सैफ अली खान)
मुंबई- अभिनेता सैफ अली खानचा 'हॅपी एंडिंग' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. यावर्षी त्याचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याने 'हमशकल्स'मध्ये काम केले होते. मात्र, तो सुपरफ्लॉप ठरला होता. आता 'हॅपी एंडिंग' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला तर सैफसाठी हे वर्ष वाईट असेल.
सैफला इंडस्ट्रीमध्ये 22 वर्षे झाली आहेत. परंतु तो अद्याप आपली ओळख सुपरस्टार्स म्हणून निर्माण करू शकलेला नाहीये. त्याचे जेवढे सिनेमे यशस्वी ठरले, त्यामध्ये त्याने को-स्टार म्हणून काम केले. मात्र, त्याच्या अभिनयावर कधीच प्रश्न उभा राहिला नाही. त्याने आतापर्यंत 5 फिल्मफेअर आणि 3 IIFA अवॉर्ड्स नावी केले आहेत. सोबतच, झी सिने अवॉर्ड्स, स्टार स्क्रिन अवॉर्ड्स, स्टारडस्ट अवॉर्ड्ससारखे अनेक अवॉर्ड्ससुध्दा जिंकले आहेत.
सैफने बॉलिवूड करिअरला 'परंपरा' (1992) सिनेमातून सुरुवात केली. त्यानंतर 'मै खिलाडी तू अनाडी', 'ये दिल्लगी', 'ओमकारा', 'दिल चाहता है', 'कल हो ना हो', 'हम तुम', 'परिणीता', 'सलाम नमस्ते', 'लव आज कल'सारख्या सिनेमांपासून 'हॅपी एंडिंग'पर्यंत या सिनेमांत विविध लूक्समध्ये दिसला. परंतु रील लाइफप्रमाणेच रिअल लाइफमध्येसुध्दा त्याचा अंदाज बदलत राहतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 1992पासून 2014पर्यंत त्याने कोण-कोणत्या सिनेमांत काम केले आणि कसा बदलत गेला त्याचा लूक...