आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाही थाटाला कंटाळलाय सैफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाबजाद्या सैफ अली खानला आपल्या नवाबीचा जराही घमेंड नाही, असे त्याच्या वतरुणीकीवरून कळते. सैफ अली खान नवाब आहे आणि त्याला लहानपणापासूनच शाही सुविधा आणि थाटामाटाची सवय आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूडच्या कलाकरांची शानदेखील राजकुमारासारखीच असते. चित्रपटजगतातही त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात; पण आता सैफ शाही थाटामाटाला कंटाळला आहे. सामान्य माणसासारखी जगण्याची त्याची इच्छा आहे. आगामी ‘कॉकटेल’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्याने कलाकरांना दिल्या जाणार्‍या सर्व सुविधा नाकारल्या.
त्याने कार, स्पॉटबाय आणि फाइव्ह स्टार हॉटेलमधून जेवण मागवणे नाकारले. त्याने टॅक्सीमध्ये फिरून शॉपिंग केली आणि आपल्या शॉपिंग्स बॅग स्वत: सांभाळल्या चित्रपटात त्याचा रोल एकदम सामान्य माणसासारखाच आहे . म्हणून सैफ सामान्य माणासाचे जीवन स्वत:वर आजमावू पाहतोय. '