आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan & Kareena Kapoor Spotted At Mumbai Airport

पतीसह लंडनहून परतली करीना, एअरपोर्टवर दिसला ग्लॅमरस Look, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड कपल सैफ अली खान आणि करीना कपूर शुक्रवारी मुंबईत एअरपोर्टवर दिसले. दोघेही लंडनहून परतले होते. यावेळी करीना आकर्षक लूकमध्ये दिसली. तिने व्हाइट इनर, ब्लॅक ब्लेजर आणि ब्लॅक जेगिंग्स परिधान केले होते. शिवाय तिच्या हातात मोठी बॅग होती. करीनाने गॉगलसुद्धा लावला होता. तर दुसरीकडे सैफ शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. त्याने डोक्यावर हॅट घातली होती. एअरपोर्टवरुन बाहेर पडताना चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता.
सैफ मागील काही दिवसांपासून लंडनमध्ये होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीना 14 ऑगस्टला तेथे पोहोचली होती. तेथे तिने मदाम तुसाँ म्युझियमलासुद्धा भेट दिली होती. तिथे तिने आपल्या मेणाच्या पुतळ्यासह फोटो काढून घेतले होते.
पुढे पाहा, एअरपोर्टहून बाहेर पडतानाची सैफ-करीनाची छायाचित्रे...