आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Latest News In Marathi, Padma Shri Award

सैफ अली खानचे \'पद्मश्री\' केंद्र सरकार परत घेणार?, हॉटेलमधील प्रकरण भोवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सैफला पद्मश्री पुरस्कार बहाल केला होता.)
नवी दिल्ली - कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनेता सैफ अली खान याला प्रदान करण्यात आलेला ‘पद्मश्री’ सन्मान काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. एका गुन्हेगारी प्रकरणात मुंबईतील कोर्टाने त्याला आरोपी ठरवल्यामुळे केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे.

सैफवर मुंबईतील एका हॉटेलमध्ये कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याच्यावर आरोपही निश्चित केले आहेत. सैफवर आरोप निश्चित झाल्यामुळे त्याचा पद्मर्शी सन्मान परत घेण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी गेल्या 14 मार्चला केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. या मागणीवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 2010मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सैफ अली खानची सोहळ्यातील खास छायाचित्रे... या सोहळ्यात त्याच्यासह करीना कपूरसुद्धा हजर होती...