(डावीकडून- इलियाना डिक्रूज, सैफ अली खान आणि कल्कि कोचलिन)
मुंबईः
सैफ अली खानच्या आगामी सिनेमाचे नाव आहे 'हॅपी एंडिंग'. या सिनेमात सैफसोबत इलियाना डिक्रूज आणि कल्कि कोचलिन मेन लीडमध्ये झळकणार आहेत. गुरुवारी मुंबईतील पीव्हीआर थिएटरमध्ये या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
या इव्हेंटमध्ये सैफ ब्लॅक टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. तर दुसरीकडे क्लिक शॉर्ट ड्रेसमध्ये अवतरली होती. तिने ब्लू कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. इलियानासुद्धा यावेळी शॉर्ट ड्रेसमध्येच दिसली. तिने व्हाइट टॉप आणि ब्लॅक स्कर्ट घातला होता.
ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये रणवीर शौरी, दिनेश विजन आणि राज निदिमोरु यांनीही हजेरी लावली होती. '
हमशकल्स' हा सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर या सिनेमाकडून सैफला बरीच आशा आहे. या सिनेमाचा तो सहनिर्मातासुद्धा आहे.
'हॅपी एंडिंग' हा सिनेमा राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेता गोविंदासुद्धा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तर
करीना कपूर आणि प्रिती झिंटा यांचेही दर्शन मोठ्या पडद्यावर घडणार आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हॅपी एंडिंग'च्या ट्रेलर लाँचवेळी क्लिक झालेली सेलेब्सची छायाचित्रे...