आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saif Ali Khan To Be Seen In Triple Role In Happy Ending

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हॅपी एंडिंग'मध्येही तिहेरी भूमिकेत दिसेल सैफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साजिद खानच्या 'हमशकल्स' चित्रपटात तिहेरी भूमिका साकारल्यानंतर सैफ अली खान स्वत:च्या बॅनर खाली बनत असलेल्या 'हॅपी एंडिंग' चित्रपटातदेखील तिहेरी लुक्समध्ये दिसणार आहे.
सैफची भूमिका एकच आहे, परंतु वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत तो वेगवेगळ्या रूपात दिसतो. चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. केवळ जुलैमध्ये शूटिंग केले जाणार्‍या एका गाण्याचे चित्रीकरण बाकी आहे. यानंतर पोस्ट प्रॉडक्शन होईल. सप्टेंबरमध्ये एखाद्या सुरक्षित शुक्रवारी प्रदर्शित केले जाण्याची शक्यता आहे.
सैफशिवाय 'हॅप्पी एंडिंग' चित्रपटात गोविंदा, कल्की कोचलिन, इलियाना डिक्रुज, रणवीर शौरी आणि करिना कपूर-खान आदींच्याही भूमिका आहेत. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राज आणि कृष्णा यांनी सैफला घेऊन 'गो गोवा गॉन' बनवला होता. त्यापूर्वी त्यांनी 'शोर इन द सिटी' चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत डेब्यू केले होते.