आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणीती दिसणार सैफ अली सोबत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाब सैफ अली खान सध्या कतरीना कैफसोबत ‘फॅँटम’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. नुकताच तो सुनील खेत्रपालच्या निर्मिती कंपनीद्वारे बनवत असलेल्या चित्रपटाशी जोडला गेला आहे. अब्बास मुस्तान दिग्दर्शित या चित्रपटात सैफसोबत परिणीती चोप्राला संधी देण्याचा विचार चालू आहे. खरं तर हे खूपच वेगळी जोडी होईल मात्र दिग्दर्शकासहित सैफने यामध्ये आपली आवड दाखवली आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीदेखील भूमिका असणार आहे. या चित्रपटाची कथा ‘द काउंट ऑफ मोंटे क्रिस्टो’ या क्लासिक कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.
परिणीतीने आतापर्यंत चित्रपटाला होकार दिला नाही. तिने आतापर्यंत दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘इश्कजादे’, ‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ‘हंसी तो फंसी’ चित्रपटात तिने लक्ष केंद्रित केले होते. आता या चित्रपटात सैफसोबतची तिची भूमिका किती परिणामकारक ठरू शकते हे सांगता येऊ शकत नाही.