आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan's Daughter Will Not Be Enter In Bollywood To 5 Years

पुढील 5 वर्षे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार नाही सैफची मुलगी, करीनाचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - सैफ अली खानची मुलगी सारा अली खान)
मुंबई- करीना कपूर अभिनेता सैफ अली खानची दुसरी पत्नी असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पहिली पत्नी अमृता सिंगपासून सैफला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सैफसोबत लग्न झाल्यापासून करीनाचे त्याच्या मुलीसोबतचे बाँडिंग वाढले आहे. म्हणूनच की काय करीना पत्रकारांशी साराबद्दल बोलताना दिसते.
काही दिवसांपूर्वी सारा तिची आई अमृता सिंगसह एका मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. तेव्हापासून सारासुद्धा आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बी टाऊनमध्ये पदार्पण करेल, असे तर्कवितर्क लावले जात होते. याविषयी अलीकडेच 'सिंघम रिटर्न्स'च्या प्रमोशनदरम्यान करीनाला विचारले असता, तिने या गोष्टीचा इंकार केला. करीनाने सांगितले, की सारा सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत असून पुढील पाच वर्षे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती या क्षेत्राचा विचार करेल.
याविषयी काही महिन्यांपूर्वी सैफला विचारणा केली असता, तो म्हणाला होता, की सिनेमात काम करायचे की नाही हा निर्णय साराचा असेल, मात्र आता तिला आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला हवे.
सैफच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे सारा...
सारा सैफ आणि अमृता सिंगची मुलगी आहे. सैफने 1991 मध्ये अमृतासह लग्न केले होते. 2004मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. सारा सध्या कोलंबियामध्ये शिकत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सैफच्या लाडक्या लेकीची खास छायाचित्रे...