आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Saif Ali Khan\'s Sister Will Be Married To Kunal Khemu

Video: 25 जानेवारीला सैफ अली खानची बहीण चढणार बोहल्यावर, साध्या पद्धतीने होणार लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : सोहा अली खान आणि कुणाल खेमू)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोहा अली खानला लग्नाचे वेध लागले आहेत. येत्या 25 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड कुणाल खेमूसोबत सोहा लग्नगाठीत अडकणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी राहत्या घरी खासगी समारंभात अगदी साध्या पद्धतीने सोहा आणि कुणालचे लग्न होणार आहे. या लग्नात दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.
सोहा अली खान रॉयल पतौडी कुटुंबातील असून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची धाकटी बहीण आहे. साध्या पद्धतीने सोहा लग्न करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याची सोहाची इच्छा आहे. लग्नात धूमधडाका असू नये, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे आई शर्मिला टागोर आणि भाऊ सैफ अली खानने सोहाच्या इच्छेला मान देत अगदी साध्या पद्धतीने तिचे लग्न होईल याकडे लक्ष देत आहेत.
खरं तर 2012 मध्ये सोहाचा थोरला भाऊ सैफ अली खानने करीना कपूरसोबत रजिस्टर्ड मॅरेज केले होते. मात्र त्यानंतर एक जंगी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत बॉलिवूड, बिझनेस आणि राजकारणातील अनेक प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, जुलै 2014मध्ये आली होती साखरपुड्याची बातमी आणि सोहा-कुणालविषयीच्या खास गोष्टी...