आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soha Kunal Wedding: Saif\'s Son Ibrahim Is All Grown Up Now!

हुबेहुब सैफसारखा दिसतोय त्याचा मुलगा, सोहाच्या लग्नात बेबोसोबत काढले फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून: अमृता अरोरा बहीण मलायकासोबत आणि सैफ अली खान मुलगा इब्राहिम आणि पत्नी करीना कपूर खानसोबत)
मुंबईः सोहा अली खान आणि कुणाल खेमू अगदी साध्या पद्धतीने लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित हे लग्न पार पडले, तर रिसेप्शन पार्टीत बी टाऊनमधील खास पाहुणे उपस्थित होते.
लग्नात सैफच्या कुटुंबातील अशी एक व्यक्ती होती, ज्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या. ती व्यक्ती म्हणजे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान. इब्राहिम हुबेहुब आपल्या वडिलांसारखा दिसू लागला आहे. ऑक्टोबर 2001मध्ये जन्मलेल्या इब्राहिमने वयाची 13वर्षे पूर्ण केली आहेत. तो उंचीत आणि लूक्समध्ये हुबेहुब आपल्या वडिलांसारखा दिसतोय. इब्राहिम सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहचा मुलगा आहे.
आई करीनासोबत दिल्या पोज
इब्राहिम आपल्या आत्याच्या लग्नात वडील सैफसोबत दिसला. इतकेच नाही तर सावत्र आई करीना कपूर खानसोबतही त्याने फोटो काढून घेतले. एका छायाचित्रात इब्राहिम सैफ, करीना, मलायका अरोरा खान आणि अमृता अरोरासोबत दिसतोय.
वडिलांचा लाडका आहे इब्राहिम
अमृता सिंह आणि सैफ अली खान विभक्त झाले आहेत. मात्र दोन्ही मुले अर्थातच मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम सैफचे लाडके आहेत. दोघेही प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये सहभागी होत असतात. विशेष म्हणजे सैफ आणि करीनाच्या लग्नातसुद्धा सारा आणि इब्राहिम यांनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इब्राहिमची सोहाच्या लग्नातील आणि काही अन्य छायाचित्रे...