मुंबई: बॉलिवूडच्या काही जोड्या सध्या आपल्या चिमुकल्याची प्रतिक्षा करत आहेत, तर काही आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहेत. मात्र एक जोडी अशीही आहे ज्यांना सध्या मुल नकोय. ती जोडी आहे सैफीना! बॉलिवूडच्या स्टाइलिश जोड्यांमध्ये सामील सैफ आणि करीनाला सध्या मुल नकोय.
रितेश आणि जेनेलिया आपल्या चिमुकल्याची येण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे इमरानला नुकतेच बाळ झाले आहे. परंतु सैफ आणि करीना आपआपले आयुष्य जगण्यात व्यस्त आहेत. दोघांचे सध्या कोणतेही प्लॅनिंग नाहीये. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झालीत. पण करीनाला अद्याप आई होण्याची इच्छा नाहीये.
बेबोने सांगितले, की प्रत्येक स्त्रीला आपल्या जीवनात आई होण्याचे सुख प्राप्त करण्याची इच्छा असते. परंतु मी सध्या याविषयी काहीच विचार केलेला नाहीये. सैफ आणि मी आम्ही दोघेही यासाठी तयार नाहीत. मी खूपच भावूक व्यक्ती आहे. म्हणून मी जर आई झाले तर माझे सर्व लक्ष माझ्या बाळावरच राहिल.
दोघांच्या लग्नाच्या काही दिवसांतच करीना आई होण्याच्या बातम्यांही प्रकाशझोतात होत्या. परंतु नंतर तिने या बातम्यांना नकारले. ती म्हणाली, की अद्याप त्या जबाबदा-या स्वीकारण्यास तयार नाहीये. करीनाला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. तसेच सैफसुध्दा आपल्या करिअरकडे लक्ष देत आहे.
तसे पाहता, करीनाला मुलांची फार आवड आहे. एवढेच नाही तर, सैफ आणि त्यांची माजी पत्नी अमृता यांची मुले सारा आणि इब्राहमच्यासुध्दा ती खूप जवळ आहे. ती सध्या 'सिंघम 2' आणि 'गब्बर'च्या शुटिंगमध्ये बिझी असून सैफ साजिद नाडियाडवालाच्या 'हमशक्ल'मध्ये व्यस्त आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफीनाचे काही निवडक छायाचित्रे...