आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायरा बानो यांची नात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची एक जवळची नातेवाईक हिंदी चित्रपटामध्ये आपला प्रवास सुरू करण्याची तयारी करत आहे. सायेशा असे तिचे नाव आहे. 90च्या दशकात 'आई मिलन की रात' आणि 'महासंग्राम'चित्रपटात दिसलेल्या सायरा बानोची पुतणी शाहीनची सायेशा मुलगी आहे.
सध्या सायेशा बॉलिवूडमधील आपल्या पदार्पणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेत आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या 'दिलीप कुमार द सब्सटेन्स अँड शॅडो : एक आत्मकथा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सायेशा आपल्या आईबरोबर पारंपरिक लूकमध्ये दिसली होती. प्रत्येक पाहुण्याबरोबर सायेशाने भारतीय परंपरेनुसार भेट घेतली. 1997 मध्ये शाहीनने सुमीत सहगलसोबत लग्न केले होते. तीन वर्षांतच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सायेशाला सांभाळण्याचे काम एकट्या शाहीनने केले होते.